आकुर्डी : सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी,पुणे~३५ या शाळेत इयत्ता ७वी अ च्या वर्गाकडे शिवजयंती उत्सव सोहळा कार्यक्रम आला होता. संस्थापक डॉ दाभाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली ३९६ वी शिवजयंती प्रशालेतील इयत्ता ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.वर्गशिक्षिका सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी प्रास्ताविक व निवेदन,शिक्षक मनोगत प्रशांत चव्हाण सर, आभार कैलास कोशिरे सरांनी तर विद्यार्थ्यांनी पोवाडा, मनोगते, शिवगीत गायन व शिवगीतावर नृत्य सादर केले. राजरत्न कांबळे, अभिराज गवारे, गौरव अडागळे या विद्यार्थ्यांनी सुंदर असे छत्रपती शिवाजीमहाराजांचे चित्र काढून रंगवले होते. प्रास्ताविक, निवेदन, शिक्षक, विद्यार्थी मनोगतात शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. आपले संविधानही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित आहे, त्याचा त्यात स्पष्ट उल्लेख ही केलेला आहे.जवळजवळ ४ शतके होत आली तरी शिवरायांचे नाव प्रत्येक भारतीयांच्या,प्रत्येक माणुसकी पुजारी व्यक्तिमत्वाच्या ओठांवर नित्य असणारच असे मत सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी व्यक्त केले. तर प्रशांत चव्हाण सरांनी संपूर्ण जीवनपट विद्यार्थ्यांच्या समोर उलगडला. सौ. उभे मॅडम, सौ.पाटील मॅडम यांचे सहकार्य लाभले.





