spot_img
spot_img
spot_img
spot_img

ख्रिश्चन धार्मिक गुरूंवर टीका करणाऱ्या आमदार पडळकर यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे निवेदन

छत्रपती संभाजीनगर – आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका जाहीर सभेत ख्रिश्चन धार्मिक गुरूंना मारणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून, या अत्यंत धक्कादायक आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विधानाच्या निषेधार्थ अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने आज पोलीस आयुक्त प्रविण पवार यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात आमदार पडळकर यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदवावा, तसेच त्यांच्या आमदारकीवर कारवाई करून ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या प्रसंगी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे शहराध्यक्ष जॉन आव्हाड, जिल्हाध्यक्ष नितीन गायकवाड, कायदा सल्लागार अ‍ॅड. डॅनियल टाकवले पा.आकाश उजागिरे तसेच सिटी युथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. यामध्ये शहराध्यक्ष – विराज शेजुळ शहर उपाध्यक्ष – रोहन पाटोळे कोषाध्यक्ष – स्वप्निल कांबळे संघटक – प्रतीक मंडलिक तसेच जुलिअस हिवाळे, विशाल घोरपडे, विनोद कुचेकर आदींचा समावेश होता.

हा प्रकार धार्मिक तेढ वाढवणारा असून त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली

Related Articles

शाळेच्या पहिल्या दिवशी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

छत्रपती संभाजीनगर - शाळा प्रवेशोत्सव 2025 कार्यक्रमातंर्गत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आदर्श उच्च प्राथमिक शाळा...

हजारो वर्षांपूर्वीचे अतिप्राचीन श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे १७ जून रोजी नांदुरा नगरीत आमगामन

नांदुरा - हजारो वर्षांपूर्वीचे महादेवाचे अतिप्राचीन ज्योतिर्लिंग श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे येत्या १७ जून रोजी नांदुरा येथे आगमन होत आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की आज...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!