वाशिम – वाशीम येथील नर्मदा सॉल्वेक्स प्रा. लि अण्ड काळुराम फूड प्रा. लि.चे संचालक संजयजी रुहाटिया यांनी 75 क्षयरुग्ण निक्षयमित्र या शासनाच्या संकल्पनेअंतर्गत दत्तक घेतले असून त्या सर्वांना प्रोटीन पावडरचे वाटप करण्यात आले.
यापुढेही असेच सहकार्य करणार असे संचालक यांनी सांगितले. यावेळी उपस्थित कमर्षीयल मॅनेजर नितेश एकघरे, एच आर शहाजी सोनुने, रवींद्र शर्मा, अनिल सोमाणी तसेच जिल्हा क्षयरोग केंद्राचे कार्यक्रम व्यवस्थापक समाधान लोणसूने, उपचार पर्यवेक्षक रामेश्वर सोनुने, मंगेश पिंपरकर, आरोग्य निरीक्षक रामदास गवई उपस्थित होते.‘निनिक्ष्य मित्र’ ही संकल्पना क्षयरोग (टीबी) रुग्णांच्या उपचारात आणि मानसिक आधारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
भारत सरकारच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP – National Tuberculosis Elimination Programme) अंतर्गत ही योजना राबवली जाते. ‘निनिक्ष्य मित्र’ ही योजना केवळ आरोग्य सेवा न देता मानवी संवेदनशीलता, सामाजिक जबाबदारी आणि सहकार्याचे मूर्त रूप आहे. अशा मित्रांमुळे अनेक टीबी रुग्ण पूर्णपणे बरे होऊन पुन्हा आपल्या जीवनात आनंदाने सहभागी होतात. प्रत्येक व्यक्ती, संस्था, उद्योग किंवा समाजसेवी संघटना ‘निक्षय मित्र’ होऊ शकते.
यामार्फत आपण एका रुग्णाचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतो. जिल्ह्यातील दानशूर, समाजसेवक यांनी निक्षय मित्र बनावे यासाठी जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.