छत्रपती संभाजीनगर – सामाजिक कार्यकर्ते एल डी ताटू यांच्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनी इंग्रजी शाळा पुंडलिकनगर येथे शाळेच्या पहिल्या दिवसी विद्यार्थ्यांचे स्वागत पेढे वाटून केले या वेळी शाळेचे संचालक डिगंबर बगाळे व प्राचार्या अर्चना बगाळे उपस्थित होते. यानंतर सावतामाळी उद्यान, पारिजातनगर उद्यान येथे विविध जातींच्या झाडांची लागवड केली.
यानंतर प्रेरणादायी विचार आत्मसात करून एकात्मता निर्माण व्हावी यासाठी महापुरुषांचे ग्रंथ वाटप केले, यानंतर निराधार महिलांना भेटवस्तू, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कर्तव्य दक्ष महिलांचा सन्मान, शैक्षणिक क्षेत्रात आदर्श शिक्षक पुरस्कार आदी उपक्रम आजच्या दिवशी राबविले या साठी शिवराणा सेवा संघ व नागरी विकास सेवाभावीसंस्था चे अँड सुभाष कोकुल्डे, दुर्गासिंग महेर, भाऊसिंग बैनाडे, देविदास जाधव, आनंद बारवाल, अंजली कोकुल्डे, नारायण उटाडे, गणेश राजपूत, सुनील वाघमारे, आदींचे सहकार्य लाभले.