spot_img
spot_img
spot_img
spot_img

आमदार असा असावा ?

राज्याच्या विधानसभा सदस्याला आपणं आमदार म्हणतो. हिंदीत विधायक म्हणतात. इंग्रजीत मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणतात. मुळातच ही असेम्ब्ली म्हणजे सभागृह, जेथे सभ्य माणसे असेम्बल केलेले असतात. असेम्बल करण्याची टेक्निक त्या त्या देशातील संविधानिक कलमांच्या आधारे सांगितली आहे. म्हणजे चार पांच लाख लोकांचा एक आमदार. भारतात साधारणतः एक तालुका एक असेम्ब्ली युनिट एक आमदार निवडण्यासाठी मानले आहे. लोकांनी दर पांच वर्षांनी निवडून देणे. निवडून देणे ही सुंदर, स्वच्छ प्रक्रिया आहे. म्हणजे चार लाखात एक सर्वोत्तम माणूस किंवा महिला. आपला आमदार हा जळगाव शहरातील सर्वोत्तम माणूस किंवा महिला असावी. जो इतिहास, भुगोल, नागरिक शास्त्र, गणित, विज्ञान, कायदा, प्रशासन, शासन, राजकारण बाबत पर्याप्त ज्ञानी असावा. तो राज्य सरकारमधे आपला प्रतिनिधी असतो, मंत्री नसला तरीही, त्याला राज्य सरकारच्या अधीन ७५ खात्यांचा पर्याप्त व आधिकातम अभ्यास असावा.पोलिस, महसूल, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी, जिल्हा परिषद, नगरपालिका, सामाजिक न्याय, नैसर्गिक संसाधने, कारखाने वगैरे वगैरे. तसेच केंद्र सरकारची खाती, त्यांची कार्यपद्धती बाबत सुद्धा ज्ञान असावे. तरच तो आपली वकालत सरकार दरबारी विधानसभेत करू शकतो.

एसपी, कलेक्टर, सीईओ, बीडीओ, तहसीलदार, अभियंता, डॉक्टर इंजिनिअर प्रोफेसर वकिल व्यापारी उद्योजक यांचेशी संवाद करू शकतो. जनतेची अडलेली कामे करवून घेऊ शकतो. तसा माणूस शोधणे, अभ्यासणे, पसंती देणे, निवडून आणणे हे सुज्ञ नागरिकांची जबाबदारी असते. या जबाबदारीने आपण नागरिकांनी अभ्यास केला, मतदान केले तर आपल्याला लोकशाही प्रणालीचा फायदा मिळतो.
भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाचा जीवनावश्यक,विकासक कामांसाठी आधिकतम राज्य सरकारशी जास्त संबंध येतो.केंद्रीय खात्यांशी कमी किंवा अनावश्यक संबंध असतो.म्हणून आपला आमदार हा वर सांगितलेल्या गुणवत्तेशी खरा पाहिजे. असे खरे खोटे ओळखण्याची सामान्य बुद्धी प्रत्येक सामान्य नागरिकाला असते, असे गृहीत धरून संविधानात प्रत्येकाला एक मताचा न मागता मताधिकार दिलेला आहे.
जळगाव शहरातील नागरिकांना आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंच आवाहन करतो कि, राजकारण, प्रशासन, शासन लोकोपयोगी करायचे असेल तर साधन सुचिता पाळली पाहिजे. गुंड, गुन्हेगार यांनी कितीही देणगी दिली, दारू दिली तरीही बळी पडू नये. बुद्धीमान, ज्ञानी, विचारवंत, प्रामाणिक, कुशल नागरिकांनी राजकारणात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग घेतला पाहिजे. देणगी मिळाली, पुरस्कार मिळाला तरीही भ्रमित होऊ नये. कारण पैसा जर बुद्धी पेक्षा वरचढ ठरला तर, गुन्हेगार हेच प्रामाणिक लोकांवर वरचढ ठरले तर भविष्य धोक्यात आहे. जळगांवमधे कालच एक पीएचडी झालेल्या निवृत्त प्राचार्य महोदयांना एक दारु विकणाऱ्या आमदाराने पुरस्कार दिला. येथे बुद्धी व ज्ञानापेक्षा दारू वरचढ ठरली. या घटनेचा, या मानसिकतेचा अभ्यास करून उच्चशिक्षित लोकांनी संशोधन करून पीएचडी मिळवावी. आम्ही कोणत्या दिशेने जात आहोत, हे कळेल.

जळगाव जिल्ह्यातील असे किती नगरसेवक, किती झेडपी सदस्य, किती आमदार, किती खासदार या लोकशाहीच्या गुणवतेला पात्र आहेत, याबाबत मुक्त चर्चा करणे आवश्यक आहे. त्यांचे भय बाळगले तर नाश अटळ आहे. आपण नागरिक कोणत्याही प्रभुती, विभुतींचे पुजक असलो तर किमान त्यांच्या विचगरांचा, कार्याचा प्रभाव आपल्यावर पडला पाहिजे. छत्रपतींची पुजा करणे, मिरवणूक काढणे आणि दुसरीकडे रेतीमाती चोरीचे धंदे करणे, सरदार पटेलांचे पुतळे बसवणे आणि दुसरीकडे दारूचे धंदे करणे, बाबासाहेबांचे उत्सव मनवणे आणि दुसरीकडे त्यांच्या विचारांच्या विरूद्ध वागणे. यामुळे त्या विभुतींबद्दल गैरसमज पसरतो. त्यांची अवमानना होते. आम्ही असे आहोत का? असा प्रश्न मला किंवा अन्य कोणाला विचारण्याऐवजी एकांतात स्वताला विचारला तर चांगले आकलन होऊ शकते. बदल होऊ शकतो. तुम्ही तुमच्या स्वतामधे बदल करवून घेतला नाही तर उर्वरित सभ्य समाज त्यात बदल घडवून आणतोच. तोच बदल आम्ही जळगाव जागृत जनमंच जळगाव मधे घडवून आणत आहोत.सभ्य लोकांना सोबत घेऊन समाजकारण, राजकारण करीत आहोत.
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनात त्यांच्या चरण जवळ बसून अनेक राजकीय गुंड, गुन्हेगार लोकांनी प्रवचन ऐकले. बाबा आणि मला आशा आहे, हे सुधारतील. लुटलेली, हरामाची संपत्ती जेथून चोरली तेथे परत करतील. जर त्यांच्यात चांगला बदल झाला नाही तर आपण नागरिक त्यांना बदलवू शकतो. ही शक्ती, ही संधी लोकशाही मुळे आपल्याला प्राप्त आहे.
मी जळगाव चा नागरिक आहे. म्हणून जळगाव शहरातील, जिल्ह्यातील अनुभव लिहीतो. हाच अनुभव इतर शहरातील, जिल्ह्यातील लोकांना येतो. तर मग, तसा अनुभव जाहिरपणे बोलण्याचे, लिहीण्याचे धाडस नागरिकांनी केले पाहिजे. लोकशाही टिकवण्यासाठी! तुम्ही आणि तुमच्या वारसांना जगण्यासाठी!

  • शिवराम पाटील, जळगाव
    ९२७०९६३१२२

Related Articles

Fiable Casinos En Ligne région française Claim Your Reward

casino Winoui Si vous souhaitez jouer rapidement à des jeux ou des affaires sans règles complexes, comme ceux qui vous semblent similaires, vous pouvez envisager...

Defer Back – Classique Favoris On-Line ♣️ région française

Cependant, il est important de se rappeler que ces bonus, ces offres, ces promotions, ce type de bonus et ces accords sont soumis à...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!