छत्रपती संभाजीनगर – येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विषयात दिक्षा वानखडे-शेगोकार यांना पीएच.
डी पदवी प्रदान करण्यात आली, दिक्षा वानखडे -शेगोकार यांनी महिला उद्योजकता आणि सक्षमीकरणाच्या विकासात जिल्हा औद्योगिक केंद्राचा अभ्यास:विशेष संदर्भ मराठवाडा आणि विदर्भ या विषयावर डॉ. सतीश ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शोधप्रबंध सादर केला, दिक्षा वानखडे यांना पीएच.डी पदवी प्रदान झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे, याप्रसंगी दिक्षा वानखडे यांना प्राचार्य राजेश शेगोकार, डॉ. मिलिंद आठवले, ऍड. नोवेलकुमार हेलोडे, प्रा. शिलवंत गोपनारायण, डॉ.विनोद अंभोरे, डॉ. राहुल तायडे, विवेक वानखडे, प्राजक्ता आठवले, दिव्या हेलोडे, संजय गाडेकर व डॉ.अंकुश गवई यांनी शुभेच्छा दिल्या.